Friday, August 1, 2014

Sakaal Newspaper covers my IM title!

My news of becoming an IM was published in a popular marathi newspaper called Sakaal. While the news covers exactly what I did in Spain, the headlines is extremely interesting.



The title of this article is quite funny and at the same time very catchy. The best I can translate is like this,
"Daughter-in-law from Pune helps Mumbai's son-in-law to an become International Master!
(anyone with better Marathi can help me translate it better)

The news can be read on this link

This is the main body of the article: While those who can understand Marathi can read the article, for those who do not I have translated the last paragraph.

मुख्यपान » क्रीडा » बातम्या

54

8

पुणेकर सुनेमुळे मुंबईचा जावई 'इंटरनॅशनल मास्टर'!
- मुकुंद पोतदार : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 - 02:15 AM IST

Tags: PuneSportsChessSagar Shah
पुणे :  मुंबईचा बुद्धिबळपटू सागर शहा याने "इंटरनॅशनल मास्टर‘ होण्याचे पहिले ध्येय गाठले आहे. बुद्धिबळपटूच असलेल्या पुण्याच्या अमृता मोकलशी विवाह झाल्यानंतर त्याने ही मजल मारली आहे. स्पेन दौऱ्यात तीन स्पर्धांत त्याने ही कामगिरी केली. 

सागरने यापूर्वी 2396 एलो गुणांकनापर्यंत मजल मारली होती; पण त्यानंतर ते 2304 पर्यंत घसरले होते. स्पेनला जाण्यापूर्वी त्याचे एलो गुणांकन 2314 होते. पाच स्पर्धा खेळून 86 गुण व उरलेला नॉर्म पूर्ण करण्याची त्याला संधी होती. मॉंटकॅडा ओपनमध्ये त्याची संधी थोडक्‍यात हुकली. त्याने ग्रॅंडमास्टर जेमी क्‍युआर्ताज अलेक्‍झांडर (2483) याला हरविले. याशिवाय त्याने ख्रिस्तियन क्रूझ (2563), हिर्रायझ हिडॅल्गो (2446), मुनोज पॅंटोजा (2457) हे तीन ग्रॅंडमास्टर व "इंटरनॅशनल मास्टर‘ सोमक पलित (2411) या सरस गुणांकन असलेल्या प्रतिस्पर्ध्यांशी बरोबरी साधली. अखेरच्या फेरीत त्याला नॉर्मसाठी केवळ बरोबरीची गरज होती; पण ग्रॅंडमास्टर कॅरेन मोवसीझीयन (2520) याच्याकडून तो हरला. नॉर्म हुकला तरी सागरला 23 एलो गुणांकनाची कमाई झाली.
या स्पर्धेत दमछाक झाल्यामुळे तो बार्बेरा ओपनमधून माघार घेण्याच्या विचारात होता; पण अमृताशी चर्चा करून त्याने अखेरच्या क्षणी खेळायचे ठरविले. अखेरीस हेच निर्णायक ठरले. त्याने एक ग्रॅंडमास्टर (मुनोझ पॅंटोजा), दोन इंटरनॅशनल मास्टर (जोनाथन क्रूझ 2470, मस्कारो मार्च पेड्रो 2417) आणि एक फिडे मास्टर (गोंझालेझ पेरेझ ऍरीयन 2494) यांना हरविले. यामुळे 53 गुणांसह त्याने नॉर्मही मिळविला. 20 दिवसांत दोन स्पर्धांत त्याने 2314 वरून 2390 एलो गुणांकन नेले. नॉर्मचे निकष पूर्ण करण्यासाठी त्याला 2400 पर्यंत एलो गुणांकन नेण्याची गरज होती. सॅंट मार्टी ओपन या तिसऱ्या स्पर्धेत नाट्यमय घडामोडी होऊन ही कामगिरी झाली. दिप्तायन घोष (2468) व मॅत्सेंको सर्जी (2474) या "इंटरनॅशनल मास्टर‘शी त्याने बरोबरी साधली, त्यामुळे एलो गुणांकन 2399.75 पर्यंत गेले. पुढील डावात त्याने नॉर्वेचा "इंटरनॅशनल मास्टर हॅन्सेन टोर्बयॉर्न रिंगडॅल (2448) याच्याविरुद्ध अतीबचाव केला; पण बरोबरीऐवजी त्याला पराभूत व्हावे लागले. नंतर त्याने दडपण झुगारून "वूमन ग्रॅंडमास्टर‘ कॉरी डेझी (2414) हिच्याशी बरोबरी साधली. याबरोबरच त्याचे "मिशन‘ पूर्ण झाले.
दोन आघाड्यांवर सुख! परदेशात स्पर्धा असल्यावर भारतीय खेळाडूंसमोर जेवणाचा मुख्य प्रश्‍न असतो. लग्नानंतर अमृताने हा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच सरावातही मदत केली. सागरच्या डावांचा आढावा घेणे, चुकांची तसेच चांगल्या चालींची माहिती देणे, हे "सेकंड‘चे कामही तिने केले. यामुळे केवळ स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकलो, असे सागरने आवर्जून नमूद केले.

(When playing overseas the main problem that confronts chess players is with regards to food. After marriage Amruta not only solved this problem regarding food but also helped Sagar with his practice. She analyzed Sagar's games, told him the mistakes he was making along with better suggestions. In short she was Sagar's second. And hence Sagar could keep his complete focus on the tournament.)

That's the original picture published in the article taken at Kolkata Open, March 2014.

No comments:

Post a Comment